सरपंच, ग्रा.पं.सदस्य रस्त्यावर, दारू अड्ड्यावर छापा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । अनोरे ( ता, धरणगाव ) येथील  ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून अवैध मद्यविक्रीचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन, येथे सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई होत नसल्यामुळे, शुक्रवारी थेट सरपंच व ग्रा.पं. सदस्यांनी छापा टाकत मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गावातील अनेक तरुण व्यसनाधीन होत असून, गेल्या सहा महिन्यात अनेकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन, अवैध दारुविक्री थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी सरपंच स्वप्नील महाजन, ग्रामपंचायत सदस्य हरी महाजन, मिलिंद पाटील, सुरेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे, विनोद संदानशिव यांनी अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकला. दोन हजार रुपये किमतीची १० लिटर दारू जप्त केली. कारवाईदरम्यान संशयित पसार झाला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

लढा सुरूच ठेवणार 

अनोरे परिसरातील गावांमध्ये गावठी दारूच्या व्यसनाने अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. याला आळा बसावा म्हणून हे धंदे बंद करण्यासाठी अनोरे ग्रामपंचायत कटिबद्ध असून, आमचा लढा चालूच राहणार आहे, असे सरपंच स्वप्निल महाजन यांनी सांगितले.
शुक्रवारी सरपंच स्वप्नील महाजन, ग्रामपंचायत सदस्य हरी महाजन, मिलिंद पाटील, सुरेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे, विनोद संदानशिव यांनी अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकला. दोन हजार रुपये किमतीची १० लिटर दारू जप्त केली. कारवाईदरम्यान संशयित पसार झाला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज