⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

संपकरी एसटी चालकास हृदयविकाराचा झटका

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव येथील एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बसचालक आबा नावरकर ( वय ३६, ) यांना गुरुवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

गेल्या चार दिवसांपासून एस.टी.चे कर्मचारी संपात उतरले आहेत. बसस्थानकाच्या परिसरात एका मंडपात हे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने बसचा चक्का जाम झाला आहे. आबा नावरकर हे चालक आहेत. चार दिवसांपासून घरीही गेले नाहीत.

गुरुवारी दुपारी त्यांना अस्वस्थ सव्वाचार वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालक आबा नावरकर यांना दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती डॉ. मंगेश वाडेकर यांनी दिली. आपल्या सहकान्यास अचानक त्रास झालेल्या अन्य कर्मचारी अस्वस्थ झाले होते.