अरे बापरे…तोंड दाबून चाळीसगावच्या वृद्धाच्या खिश्यातुन लांबविली रोकड ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव शहरातील एका ६५ वर्षीय वृध्दाचे तोंड दाबून त्यांच्या खिश्यातील १ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सनी विष्णु चव्हाण (वय-२२) असे संशयित आरोपीचे नाव असून, याप्रकरणी वृद्धाच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, रामदास दौलत पाटील ( वय-६५ ) रा. हिरापुर ता. चाळीसगाव. सेवानिवृत्त आहे. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम समोर आले. त्यावेळी संशयित आरोपी सनी विष्णु चव्हाण (वय-२२) रा. वडगाव गंगापुर जि.औरंगाबाद या तरूणाने मागून येवून त्यांचे तोंड दाबुन त्यांच्या खिश्यात असलेले १००० रूपयांची रोकड काढून घेतले व पसार झाला.
दरम्यान रामदास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज