fbpx

धानोरा येथे २५० वर्षाचे पुरातन महाकाली मातेचे मंदिर

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जळगाव रस्त्यावरील पालक नालावरील भागात सुमारे २५० वर्ष जुने पुरातन मंदिर आहे. नवरात्रोत्सवात या मंदिराचे रंग रंगोटी करून संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई ने सजवण्यात येते. मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी जागृत देवस्थान असल्याने ९ दिवसापर्यंत या ठिकाणी परिसरातील भाविक भक्त देविमातेच्या दर्शनासाठी मोठ्या संखेने गर्दी करत असतात.

तसेच नवरात्राच्या पहिल्या माळेला तापी नदीचे पाणी आणून या पाण्याने देवीचा अभिषेक अनुसयाबाई बोदडे यांच्या हस्ते करण्यात येत असतो.तसेच मंदिरावर भगवा ध्वज चढवला जातो.अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी होम हवन केले जाते,तर नवमीच्या दिवशी देवीची काठी (ध्वज)ची संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.तसेच या दिवशी भाविक देवी पुढे आपले नवस मानून मनोकामना पूर्ण झाल्यास ते आपला नवस या दिवशी येथे फेडण्यासाठी येत असतात.

मंदिराचा इतिहास

जाणकारांच्या मते हे मंदिर सुमारे २५० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते.त्या वेळी मंदिर लहान स्वरूपाचे होते तर मंदिरात महाकाली देविमातेचे पाषाण च्या दगडी गोट्यांच्या स्वरुपात पूजा करण्यात येत होती.मंदिरात देवीचा प्रत्यक्ष साक्षात्कार मंदिराचे पुजारी सूकनाथ बाबा यांना झाला असल्याचे सांगण्यात येते.२००२ मध्ये श्रावण महिन्यात अनुसयाबाई बोदडे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांकडून लोकवर्गणी गोळा करून व त्यांचे पती आत्माराम बोदडे यांनी आपल्या कमाईच्या काही भाग ह्या मंदिराच्या बांधकामासाठी देऊ करून या ठिकाणी मोठे मंदिर उभारले.

मंदिरात महाकाली देवीचे काळे पाषाणाचे दगडाचे गोटे असल्याने गावातीलच भरत सूर्यवंशी या भाविकाने आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल काळ्या पाषाणाची महाकाली मातेची मूर्ती ची विधिवत स्थापना करण्यात आली.यावेळी देवी मातेची मूर्ती संपूर्ण गावातून मिरवणूक काढत गाव पगतीचे (भंडारा) चे आयोजन करण्यात आले होते.सध्या मंदिराची देखभाल व पूजा आरती महिला पुजारी अनुसयाबाई बोदडे करीत असतात.

मंदिरात महाकाली माता हे जागृत देवस्थान असून भाविक भक्त याठिकाणी नवस मानत असतात.याठिकाणी भाविक लहान मुलांचे जाउळ देणे,कर्णछेदन करणे असे विविध धार्मिक कार्य मोठ्या श्रद्धेने पार पडतात.
– अनुसयाबाई बोदडे (मंदिराच्या पुजारी)

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज