fbpx

माझ्या पतीचे दुसरे लग्न करून घ्यावे.. सुसाईड नोट लिहून आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । जामनेर तालुक्यातील देवुळगाव गुजरी येथील एका विवाहीतेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनिषा सुरेश आवटे(वय२५) असे मयत विवाहीतेचे नाव असून आत्महत्यापुर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार न धरता माझ्या पतीचे दुसरे लग्न करून द्यावे असे म्हटले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, देवुळगाव गुजरी येथील मनिषा आवटे या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत मनीषा हीच पती मनिष आवटेचा एस.टी महामंडळात वाहक म्हणून सेवेत कार्यरत आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी तिने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

mi advt

त्यात आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार न धरता माझ्या पतीचे दुसरे लग्न करून द्यावे असे म्हटले आहे. दरम्यान, मृत्युसमयी मनीषा ही गर्भवती असल्याची माहिती मिळत आहे. या आत्महत्येचा पुढील तपास पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहे.मयत मनिष आवटेचा पती एस.टी महामंडळात वाहक म्हणून सेवेत कार्यरत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज