यावल येथे २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । यावल शहरातील तिरुपती नगरात एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शाहिस्ताबी शेख जावेद असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून ही घटना आज रविवारी दुपारी उघडकीस आली. आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शहरातील तिरुपती नगरातील रहिवासी शेख जावेद हे प्लंबिंग चे काम करून उदरनिर्वाह करतात रविवारी ते आपल्या मुलीला घेऊन सावदा येथे गेले होते. तर त्यांचे आईवडील त्यांच्या ६ वर्षीय मुलगा भुसावळ गेला होता. घरी त्यांची पत्नी शाहिस्ताबी शेख जावेद वय २५ ही एकटी होती. तेव्हा शेख जावेद हे दुपारी साडेतीन वाजेला घरी परतले तर घरातील दरवाजा आतुन बंद होता त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता शहिस्ताबी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली तेव्हा याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.

या प्रकरणी शेख जावेद यांच्या खबरी वरून यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण, सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे मयत शाहिस्ताबी ही क्षयरोगाने त्रस्त होती व आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मयत हिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असुन तिने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar