वाकोदजवळ ट्रकमध्ये आढळल्या २५ मृत गायी

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । वाकोद गावापासून १ किमी अंतरावर मृत गायी असलेला ट्रक आढळला. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर पहुरकडून औरंगाबादकडे जाणारा ट्रक (क्र.पी.बी. ०३ ए. झेड. ९९०७) या वाहनात २० ते २५ मृत गायी आढळल्या.

वाकोद गावाजवळील नर्सरीजवळ चालकाने हा ट्रक सोडून दिला. अमानुष वाहतूक केल्यामुळे गायींचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. संबंधित ट्रकचालक व क्लीनर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी पंचनामा करण्यात येईल, त्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज