fbpx

लोहारा ग्रामपंचायतमध्ये घोटाळा, तत्कालीन सरपंच, उपसरपंचावर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच, ग्रामसेवकांनी ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये बनावट ठराव टाकून गावठाण जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे नमुना नंबर 8 चे सात बारा उतारे तयार करून ग्रामस्थांकडून देऊन कोट्यवधीं रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे प्रकार समोर आला आहे. विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली आहे.

2019 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर ग्रामसभा घेऊन तत्कालीन सरपंच मालतीबाई संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी यांनी ग्रामविकास अधिकारी आर टी बैसाणे यांनी संगनमत करून नामुना नंबर 8 चे बनावट उतारे 7/ 12 तयार करून वाटप करून मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झाले. या प्रकरणी तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या सह अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागा कोणालाही देता येत नाही. सात बारा उतारा ही देता येत नाही, अस असताना लोहारा ग्रामपंचायत चे माजी सरपंच आणि ग्रामवसेवकान बनावट दाखले तयार केले. त्यात सही शिक्का मारून लोकांना सर्रास दाखले देण्यात आले. हे दाखले एक दोन लोकांना नाही तर तब्बल 432 लोकांना हे दाखले देण्यात आले.

सातबारा उतारा घेणाऱ्या ग्रामस्थांनी नविन सरपंच यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर विद्यमान सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितल्यावर हा मोठा घोटाळा उघडकीस आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज