विहरीत बुडून २२ वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । पाटणा (ता.चाळीसगाव) येथील एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि २२ रोजी घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सणुजा निरजराव फराटे (वय-२२, ह.मु. पाटणा, ता.चाळीसगाव) या विवाहित तरूणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.२२ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फराटे यांचे सासर पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील असून त्या आपल्या आई-वडिलांकडे आलेल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज