रेल्वेखाली झोकून देत तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । म्हसावद जवळ एका २२ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. सागर गणेश खडसे (वय २२) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत असे की, आज सकाळी म्हसावद ते माहेजी दरम्यान पोल नं ३९४\११/१२ जवळ पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील सागर खडसे या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. यावेळी रेल्वे आरपीएफ पोलिस प्रमोद सांगळे, म्हसावद आवूट पो.स्टे.चे पो.ना. स्वप्नील पाटील. पो काॅ हेमंत पाटील हे पुढील तपास करीत आहे. स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -