fbpx

चाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक येथे राहत असलेला 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. महेश विजय सिंग राजपूत (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.  दरम्यान याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव येथील जय बाबाजी चौक येथे राहणारा महेश राजपूत याने आज सकाळी राहत्या घरात दोरीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

mi advt

या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नगरसेवक प्रदीप राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली तर घटनास्थळी या तरुणाचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच चाळीसगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन पंचनामा केला आहे.

या तरुणाचा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला आहे. दरम्यान नगरसेवक प्रदीप राजपूत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज