fbpx

किनगावात २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ ।  यावल तालुक्यातील किनगाव येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली आहे. रवीन्द्र रमेश गायकवाड (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या आत्महत्यामागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. याबाबात यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

याबाबत असे कि, रवीन्द्र गायकवाड अविवाहीत तरुणाने आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील दरवाजे बंद करून छताला दोरी बांधुन दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आई वडील हे शेतातुन मजुरी करून परतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

मयत रवीन्द्र गायकवाड या तरुणाचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी शवविच्छेदन केले. या संदर्भात यावल पोलीसात मयताचे मामा उखा रामलाल जाधव यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. या अविवाहीत तरूणाने आत्महत्या का केली असावी याचे कारण मात्र समजु शकले नाहीत दरम्यान मागील पाच दिवसातील किनगाव गावातील तरुणाने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज