कन्नड घाटातून मोटारसायकल लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील तरुणाची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी कन्नड घाट येथून चोरीस गेली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की गणेश राठोड (वय 25 रा. लोंजे तालुका चाळीसगाव) हा कामानिमित्ताने 23 सप्टेंबर रोजी कन्नड येथे चालला होता. त्याने काही वेळाकरता कन्नड घाटाच्या पहिल्या वळनावर दुचाकी (क्रमांक एम एच 19 डी एफ 5168) पार्किंगला लावली होती. त्यानंतर काही वेळाने त्याचे लक्ष गेल्यावर मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. दरम्यान गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज