महिलांवरील हिंसेविरुद्ध पोलीस निरीक्षकांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । महाराष्ट्रात महिलांवरील हिंसाचार वाढत आहे. या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. यासंदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

दरम्यान, यात दोषीवर लवकरात लवकर कारवाही करावी व पुढे या प्रकारच्या घटना घडून नये, यासाठी कायदा करावा अशीच मागणी या निवेदनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. यावेळी केशव पाटील, अभय काळे, रोहित पाटील, गणेश मिस्त्री, प्रितेश पाटील, पवन सातपुते, भूषण पाटील, कुणाल पाटील, देवयानी भावसार व प्रगती काळे गौरव नांद्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज