खळबळजनक घटना ; पतीसह सहा जणांनी विवाहितेचा केला शारीरिक व मानसिक छळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ ।    विवाहितेला व्यापार करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावे, यासाठी पतीसह सहा जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची खळबळजनक घटना नशिराबादमध्ये उघडकीस आली आहे.   याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील माहेर असलेल्या सानिया सलीम सैय्यद  (वय-२०) यांचा विवाह सलीम मुक्तार सैय्यद रा. ओझर मुल्लावाडा ता. निफाड जि. नाशिक यांच्याशी ३० डिसेंबर २०१८ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून सुरुवातीचे ६ महिने सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती सलीम सैय्यद  यांच्यासह सासरच्या मंडळीनी व्यापार करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणावे अशी मागणी केली. सासरच्या मंडळींनी केलेले मागणी पूर्ण न झाल्याने पती यांच्यासह सासरकडील मंडळींनी वेळोवेळी मारहाण शिवीगाळ व मारहाण करून गांजापाठ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता सानिया सलीम सैय्यद या नशिराबाद येथील माहेरी निघून आल्या. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सलीम मुक्तार सैय्यद, सासरे मुक्तार अमीर सैय्यद , सासु शकिला मुक्तार सैय्यद , जेठ मुस्तफा मुक्तार सैय्यद, जेठाणी सुमैय्या मुस्तफा सैय्यद  आणि दीर वसीम मुक्तार सैय्यद  सर्व रा. मुल्लावाडा ओझर ता.निफाड जि.नाशिक यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज