fbpx

ओबीसी आरक्षण हक्क परिषद नियोजनासाठी बैठक उत्साहात 

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । नागोबा मढी येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणारी ओबीसी आरक्षण हक्क परिषद नियोजनासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी प्रतिभाताईंनी मी सांगितले की सदरील परिषदेस ओबीसींचे राष्ट्रीय नेते मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळ धनंजय मुंडे, रामहरी रुपनवर, .शब्बीर अन्सारी यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत तरी आपल्या न्याय हक्कांसाठी परिषदेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले

यावेळी करीम सालार,पणन महासंघाचे संचालक संजय पवार, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,माजी नगरसेवक विजय महाजन,नगरसेवक असलम पिंजारी यांनी ओबीसी परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.यावेळी शालिग्राम गायकवाड,रवींद्र महाजन,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,अमित पाटील,जहिरोद्दीन कासम,राजेंद्र महाजन,रुपेश माळी,संजय महाजन,जावेद मुजावर,सचिन धांडे,संजय महाजन,अरुण माळी,संजय चौधरी,प्रमोद महाजन,अरुण महाजन,गजानन महाजन यांच्यासमवेत असंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

mi advt

समता परिषदेचे शहराध्यक्ष सागर महाजन यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले.तालुकाध्यक्ष अरुण महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले.बैठक यशस्वीतेसाठी देविदास महाजन,भावलाल महाजन,सागर महाजन,आकाश महाजन,गणेश महाजन,मनोज महाजन, प्रल्हाद महाजन,कविराज पाटील,शिवदास महाजन, मधुकर महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज