fbpx

छगन भुजबळ शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर ; असा असणार दौरा?

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवार 24 सप्टेंबर 2021रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार, 24 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 4 वाजता चांदवड, जि. नाशिक येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नगर नामकरण व फलक अनावरण, स्थळ – महात्मा फुले नगर, पोलनपेठ, जुने बसस्थानकाजवळ, जळगाव. रात्री 8 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण, रात्री 8.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.

शनिवार, 25 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 9 वाजता अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक स्थळ – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव, सकाळी 10 वाजता, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जळगाव शहर व जिल्हा बैठक, स्थळ – राष्ट्रवादी भवन, आकाशवाणी चौक, जळगाव, सकाळी 11.30 वाजता, ओबीसी बहुजन हक्क परिषद, स्थळ – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव दुपारी 1 वाजता, पत्रकार परिषद – स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव, दुपारी 1.30 वाजता मोटारीने हरेश्वर नगरकडे प्रयाण, दुपारी 1.45 वाजता, हरेश्वर नगर येथे आगमन व राखीव, स्थळ :- पियूष हॉस्पिटल, 28 हरेश्वर नगर, बँक ऑफ बडोदा समोर, रिंगरोड, जळगाव. दुपारी 3.00 वाजता मोटारीने धुळेकडे प्रयाण.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज