fbpx

रोझोद्यातील २१ वर्षीय युवकाने घेतला गळफास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । रावेर तालुक्यातील रोझोदा येथील २१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. प्रशांत वासूदेव मेढे (वय-२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, प्रशांत मेढे हा तरूण रात्री कुटुंबियासह जेवण करून ११ वाजता झोपायला गेला. दरम्यान ११ ते मध्यरात्री १ वाजेच्या दरम्याने तरूणाने काहीही कारण नसतांना राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने खाली उतरवून गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशांत याने गळफास का घेतला? याबाबत अद्यापही कळू शकले नाही.

याप्रकरणी वडील वासुदेव धनजी मेढे यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुरेश अढायंगे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज