केंद्राच्या वीज संशोधन कायदा विरोधात २१ संघटना करणार संप

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । केंद्र सरकारच्या वीज संशोधन कायदा २०१च्या विरोधात १० ऑगस्ट रोजी देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या बैठकीत विविध २३ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. हा संप यशस्वी करण्यासाठी ९ ऑगस्टला द्वारसभा घेण्याचेही या वेळी ठरविण्यात आले.

वीज कंपन्यांचे खासगीकरण थांबवावे यासाठी परिमंडळातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत सर्व कामगार, अभियंते, अधिकारी यांनी संघटीत होऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले अाहे. आढावा बैठकीत आर. आर. सावकरे, विरेंद्र पाटील, विजय सोनवणे, देवेंद्र भंगाळे, सिद्धार्थ लोखंडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -