⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चाळीसगाव तहसील कार्यालयाचे वीज कनेक्शन कट

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ ।  वारंवार नोटिसा देऊनही थकीत वीज बिल न भरणाऱ्या चाळीसगाव येथील तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित करण्याची कारवाई आज केली आहे.

सर्वसामान्य ग्राहकांच्या घरांवर वीजबिल भरण्यासाठी चकरा मारणाऱ्या वेळ प्रसंगी वीज कनेक्शन देखील खंडित करणाऱ्यांच्या चाळीसगाव महावितरण कंपनीच्या थकबाकीदारांच्या यादीत चाळीसगाव तहसील कार्यालयात देखील समावेश होता. या कार्यालयाकडे जवळपास दोन लाख 22 हजार रुपयांची थकबाकी थकीत होती. महावितरण कंपनीने वीज बिल भरण्यासाठी तहसील कार्यालयाला नोटिसा आणि सूचना देखील केल्या होत्या. मात्र तरी देखील थकीत वीज बिल हे कालपर्यंत न भरल्याने आज सकाळी महावितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. वीज पुरवठा नसल्याने आज तहसील कार्यालयातील कामकाजावर त्याचा परिणाम जाणवला.

दरम्यान याबाबतची अधिक माहिती मिळवा असे समजले की महावितरण कंपनीने तहसील कार्यालयाला थकीत वीज बिल भरण्यासाठी लेखी पत्र व सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसील कार्यालयातर्फे सदर कार्यालयाकडे निधी नसल्याने आणि निधी प्राप्त झाल्यानंतर विज बिल भरण्याचे कळविण्यात आले होते. तरीदेखील आज महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याचे आपले कर्तव्य बजावले.