⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई ; ५ बैलांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । येथे धरणगाव हाय-वे चौफुली वर नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांनी ३० हजार रूपये किमतीच्या ५बैलांची अवैध वाहतुक करणार्या पिकअप गाडीला बुधवारी १५ सप्टेंबर२०२१ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

एम.एच.०५ बी.एच.९२०३ क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी ५ बैलांना कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणावकडून येऊन म्हसावद कडे जात असताना मिळून आली.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला भाग६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५अ(१)प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामू अर्जून शिंदे व अनिल रमेश नोजे दोघे रा.दहीवद ता. शिरपूर (धुळे) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाटील, संदीप पाटील,संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.