fbpx

मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गणेश घाटावर गर्दी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्युज | १४ सप्टेंबर २०२१ | जळगाव महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे मंगळवारी गणेश विसर्जनासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शहरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन केले जाते. यावर्षीही नागरिकांनी गणपती विसर्जनासाठी झाले होते. मात्र मेहरूण तलावावर गर्दी कमी करण्यासाठी लागणारी कोणतीच उपा योजना महानगरपालिकेतर्फे राबवण्यात आली नसल्याने नागरिकांची एकच गर्दी या वेळी पाहायला मिळाली.

गेल्या वर्षी कोरूना च्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर उपायोजना केल्या होत्या. ज्यात मूर्ती संकलन करण्यात आले होते. मात्र यंदा महानगरपालिकेने अशा कोणत्याही उपा योजना राबवल्या नाहीत. ज्यामुळे सहाजिकच नागरिकांचा ताफा गणेश विसर्जनासाठी मेहरूण तलावावर वळला. मेहरूण तलावात देखील कोणत्याही प्रकारचे बॅरिकॅडींग करण्यात आले नव्हते किंवा त्या ठिकाणीही मूर्ती संकलन करण्यात येत नव्हते. त्यामुळे परिसरात एकच गर्दी पाहायला मिळाली.

 

प्रत्येका नागरिकाला तलावर प्रवेश

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना विसर्जनासाठी मेहरूण तलावावर जाण्यास मज्जाव केला होता. मेहरूण तलावाच्या प्रवेशद्वारावरच मूर्तींचे संकलन करण्यात येत होते. ज्यामुळे मेहरून तलावावर गर्दी दिसून आली नाही. मात्र यंदा महानगरपालिका हातावर हात ठेवून फक्त होणारी गर्दी शांतपणे बघत राहिली असेच चित्र निर्माण झाले होते.

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज