fbpx

नशिराबादेत झाली घरफोडी , दागिने लंपास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । नशिराबाद येथे अज्ञात व्यक्तींनी घरातून करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

नजरूल इस्लाम खलील अहमद रा. परकोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ते ९ सप्टेंबर रात्री ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून लॉकर तोडून त्यातील सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नजरूल इस्लाम खलील अहमद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज