शिरसोली उपसरपंचपदी सकुबाई पाटील बिनविरोध

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । शिरसोली प्र.न.येथिल उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतमध्ये सकुबाई मिठाराम पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

शिरसोली प्र.न. येथिल ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १७ आहे. ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास आठ महिन्याच्यावर कार्यकाळ संपला आहे. सरपंचपद हे अनुसुचित जमाती पुरुष राखीव असल्याने १७ फेब्रुवारी रोजी सरपंचपदी हिलाल मल्हारी भिल्ल तर उपसरपंचपदी श्रावण शंकर ताडे यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंच ताडे यांनी ठरल्याप्रमाणे ६ महिने उपसरपंचपदाचा कार्यकाळ साभाळला त्यानंतर त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल यांच्याकडे देऊन २३ ऑगस्टरोजीच्या ग्रा.प.च्या मासिक सभेत मजुर करण्यात आला. रिक्त असलेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी ठरल्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मिठाराम आनंदा पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. सकुबाई मिठाराम पाटील यांची आज दुपारी २ वाजता उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी १७ सदस्यांपैकी १६ सदस्य उपस्थित होते. तर १ सदस्य गैरहजर होते.

यावेळी माजी उपसरपंच श्रावण ताडे, ग्रा.प. सदस्य रामकृष्ण काटोले, शशिकांत अस्वार, विनोद अस्वार, गौतम खैरे, मुद्दसर पिंजारी, भगवान पाटील, द्वारकाबाई बोबडे, भागाबाई ताडे, पुष्पलता सोनवणे, शारदा पाटील, ज्योत्स्ना पाटील, मिना बोबडे, जमुनाई साबळे, उपस्थित होते. तर निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी सुनील दांडगे, नाना पाटील, वना बारी, उमेश महाजन यांनी पार पाडली.

नवनिर्वाचित उपसरपंचांचे शेनफडू ( आबा ) पाटील, वासुदेव बोरसे, सुभाष अस्वार, भगवान बोबडे, गोकुळ ताडे, नाना हवलदार, संजय सुर्यवंशी, उमाजी पानगळे, घनश्याम काटोले, सुनिल माळी, बशिर पिंजारी, सईद पिंजारी, चंद्रशेखर काळे, पिरण खर्चे, संजय खैरनार, बापू सोनवणे, उत्तम खर्चे, सुनिल बारी तर शिरसोली प्र . बो . येथील माजी प स सभापती नंदलाल पाटील , सरपंच प्रदीप पाटील , मुरलीधर ढेंगळे यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -