fbpx

२०० किलोमीटर स्पर्धा : जिल्ह्यातील पहिल्या सायकलस्वार डॉ.अनघा चोपडे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । औरंगाबाद येथे आयोजित २००किमीच्या बीआरएम सायकलिंगच्या स्पर्धेत जळगांव येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ.अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग घेत ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

२०० किमी सायकलिंग स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १३ तास ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला होता. डॉ.अनघा चोपडे यांनी ही स्पर्धा फक्त ९ तास २८ मिनिटांत पूर्ण केली. डॉ.अनघा या जळगांव जिल्ह्यातील पहिल्याच डॉक्टर आहेत ज्यांनी ही २०० किमीची स्पर्धा पूर्ण केलेली आहे.

२०० किमी सायकलिंग पूर्ण करण्याऱ्याला रॅन्होनियर म्हणतात. युके, ऑस्ट्रेलिया, ब्राझील या देशांत या स्पर्धेला आडाक्स म्हणूनही ओळखले जाते.

या स्पर्धेत मिळविलेल्या यशासाठी जळगांव आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी, सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, सहसचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, जनसंपर्क अधिकारी डॉ.दिलीप महाजन, राज्य आयएमएचे पदाधिकारी डॉ.अनिल पाटील, डॉ.स्नेहल फेंगडे आणि डॉ.अनघा चोपडे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज