प्रवाशांनो लक्ष द्या : भुसावळ विभागातून धावणाऱ्या २० गाड्या रद्द

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बिलासपूर विभागात चौथी लाईन कनेक्टिव्हीटीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून यामुळे भुसावळ विभागातून बिलासपूरकडे जाणाऱ्या तब्बल २० मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होतील.

या गाड्या रद्द 

बिलासपूर येथील कामामुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये १२८७० अप हावडा ते मुंबई १० डिसेंबर, १२८६९ डाउन मुंबई ते हावडा ही गाडी १२ डिसेंबर, वलसाड-पुरी (२२९०९) ही गाडी ९ डिसेंबर, पुरी-वलसाडी ही गाडी १२ डिसेंबर, संत्रागाची ते पुणे ही गाडी ४ डिसेंबर, पुणे-संत्रागाची ही गाडी ६ डिसेंबर, हटिया-लाेकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ४ डिसेंबर, एलटीटी-हटिया ही गाडी ६ डिसेंबर, पुरी-एलटीटी ही गाडी ७ डिसेंबर, एलटीटी-पुरी ही गाडी ९ डिसेंबर, भुवनेश्वर-एलटीटी ही गाडी ६ व ९ डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी ८ व ११ डिसेंबर, कामाख्य-एलटीटी ४ डिसेंबर, एलटीटी-कामाख्य ७ डिसेंबर, हावडा ते मुंबई ५ डिसेंबर, मुंबई-हावडा ही गाडी ७ डिसेंबर, तर एलटीटी-शालिमार ही गाडी ८ डिसेंबरला रद्द असेल.

याशिवाय शालिमार ते एलटीटी १० डिसेंबर, पोरबंदर-संत्रागाची ३ डिसेंबर, संत्रागाची-पोरबंदर ही गाडी ५ डिसेंबरला रद्द केली आहे. प्रवाशांनी या बदलाची नाेंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आधीच एसटीचा संप, त्यात महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -