fbpx

सकी धरण ओव्हरफ्लो । शेतक-यात आनंद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२१| रावेर तालुक्यातील अनेक गावाची जीवन वाहिनी व शेतक-यासाठी महत्वपूर्ण असलेले सुखी नदी वरील गारबर्डी धरण पूर्णपणे भरले आहे. रात्री मध्यप्रदेश व सातपुडा परिसरसतील दमदार पाऊस झाल्याने बहुप्रतीक्षित गारबर्डी धरण भरेल व ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. धरणाच्या खालील क्षेत्रात यामुळे पाणी आले असून या परिसरसतील शेतक-यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. फैजपुर शहरास येथून पाणी पुरवठा होतो, तर चिनवाल कुंभारखेडा, लोहारा, सावखेडा, आदि गावा साठी देखील हे महत्वपूर्ण आहे,

धरण ओव्हर फली होऊन नदिस पाणी आल्याने यापरिसरात शेतीस फायदा होणार आहे विहरी व कुपनालिका यांची खालावालेली पाणी पातळी सुधारण्यास मदत होणार आहे, ऐन पोळया चे सणा वर धरण भरल्याने शेतक-यांचा आनंद द्वगुणीत झाला आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज