विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे शिक्षकदिन उत्साहात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१।  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा, वाघ नगर, जळगाव मध्ये भारताचे  द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आला.

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला पाठबळ देण्याचे काम करते.  शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात. म्हणून शिक्षक प्रति प्रेम, आदर भाव व्यक्त करण्यासाठी हा दिन विद्यार्थ्यां मार्फत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापकाची भूमिका साकारणाऱ्या महेश सोनवणे या विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची भूमिका करून अध्यपनाचे कार्य ऑनलाईन पद्धतीने केले. मराठी, इंग्रजी, हिंदी,गणित,विज्ञान,इतिहास,भूगोल या विषयांची तयारी करून त्यांनी अध्यापन कार्य केले. यात पालकांनीही विद्यार्थी शिक्षकांचे विशेष कौतुक करून उत्साह वाढवला.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,ऑनलाईन पध्दतीने अध्ययन करणे जेवढे अवघड आहे त्यापेक्षा सर्वांना अध्यापन करणे अधिक अवघड आहे. शिक्षकांच्या कोरोना काळातील अध्यापन कार्याला विद्यार्थ्यांनी सलाम केला.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्ययनासाठी सहभागी करण्यास प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -