fbpx

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना चोपड्यात मदत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत आठ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजाराचे धनादेश आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य जिल्हाप्रमुख महिला आघाडी रोहिणी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, जि.प.सदस्य हरिषभाऊ पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील, नगरसेवक किशोर चौधरी, गुलाब ठाकरे, माणीकबापु महाजन, ए.के गंभीर सर, संतोष अहिरे, संजय शिरसाठ, गोपाल चौधरी, किशोर कोळी व तसेच तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे, नायब तहसीलदार राजेश पऊळ,अव्वल कारकून अविनाश जाधव, योगिता न्हाळदे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज