⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जळगाव जिल्ह्यासाठी पुढील काही तास महत्वाचे ; IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । राज्यात सर्वदूर दमदार पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अधूनमधून पाऊस कोसळत होता. मात्र रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. चाळीसगाव तालुक्याला ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, येत्या २४ तासात जळगाव जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आठवड्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. यामुळे अनेक नद्यांना महापूर आला आल्यामुळे चाळीसगाव शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, कर्नाटकात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहणार आहे. राज्यातील पालघर, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.