fbpx

सोलर प्रकल्पाची चौकशी एसआयटी मार्फत न झाल्यास आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ ।  चाळीसगाव तालुक्यातील बोढरे, शिवापुर, पिंपरखेड या गावांच्या शिवारातील बाराशे एकर जमिनीवर उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाची चौकशी एसआयटी मार्फत सुरू न झाल्यास येत्या 21 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांसह कृती समितीचे सदस्य बेमुदत उपोषण करतील असा इशारा शेतकरी बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मुंबई येथे मंत्रालयात भेटून दिला आहे. व या दोन्ही मंत्र्यांना मागणीचे निवेदन देखील सादर केले आहे

कृती समितीने मुंबई येथे आझाद मैदानामध्ये असलेल्या मुंबई पत्रकार परिषद भवनात पत्रकार परिषद घेऊन बेकायदा सोलर प्रकल्पाची आणि या प्रकल्पासाठी या बेकायदा जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत त्याची तसेच प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची माहिती पत्रकारांना दिली आणि कृती समितीमार्फत या प्रकल्पाच्या विरोधात केलेल्या सर्व आंदोलनाची कल्पना देखील पत्रकारांना दिली. पत्रकार परिषदेला कृती समितीचे सदस्य किशोर सोनवणे अध्यक्ष भरत चव्हाण ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथ माऊली प्राणीमित्र इंदल चव्हाण उपस्थित होते कृती समितीचे सचिव भीमराव जाधव शेतकरी रमेश चव्हाण कुशल राठोड सुभाष वंजारी मदन राठोड समाधान साबळे सोमनाथ राठोड रामचंद्र राठोड अरुण जाधव उपस्थित होते

श्री भीमराव जाधव यांनी कृती समितीने केलेल्या आंदोलनाची उपोषणाची माहिती पत्रकारांना दिली व बेकायदा सोलर प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा समावेश आहे त्यांच्या खरेदीचा व्यवहार कसा बेकायदेशीर झालेला आहे व त्यातून शेतकऱ्यांची कशी फसवणूक झाली याचीही माहिती दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज