यावल येथे साईबाबा पतसंस्थेची १८ वी वार्षिक सभा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । यावल येथील साईबाबा नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेची १८ वी वार्षिक सभा संस्थांचे चेअरमन भाऊराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली.

यावेळी वार्षिक सभेत गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी आपली मनोगत  व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक साईबाबा पतसंस्थेचे माजी संचालक अधी. देवकांत पाटील यांनी तर संस्थेचे संचालक दिनकर क्षीरसागर यांनी सर्व उपस्थित सभासदाचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती
सभेसाठी विरावली विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेरमन पीक संरक्षण चे संचालक गोरख पाटील, दहिगावचे बी.डी. पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे संचालक गिरीष पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पवन पाटील आदींची उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
सभा घेण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक प्रफुल्ल देशमुख संस्थेचे कर्मचारी महेश बोरसे , हेमचंद्र मोरे ,चंद्रकांत बारी ,रवींद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज