विरावलीचा मुख्य रस्ता झाला चिखलमय, रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ग्रा.प.सदस्यांचे ग्रामसेवकांना निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २५ ऑगस्ट २०२१ | यावल तालुक्यातील विरावली गावात खालचे गाव बस स्थानकापासून ते नजीर तडवी यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्ण चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून पायी चालणे कठीण होऊन गेले आहे.

दरम्यान, या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी आज विरावली ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, शोभा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य शकुंतला विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य हमीदा टेनु तडवी ग्रा.पं.सदस्य यांच्या वतीने देण्यात आले.

काय म्हटलं आहे निवेदनात?

या निवेदनात म्हटले आहे की, विरावली गावात खालचे गाव बस स्थानकापासून ते नजीर तडवी यांच्या घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पायी चालणे कठीण होऊन जाते लहान मुले म्हातारी माणसे यांना पडण्याची भीती निर्माण होते. तसेच हा रस्ता पावसाळ्यात चालणे योग्य राहत नाही.

म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे, अशी सर्व खालचे गाव विरावली वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांची मागणी आहे. म्हणून आपण प्राध्यान्य क्रमाने 15 व्या वित्त आयोगातून या रस्त्याची मागणी लवकरात लवकर मान्य करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशा आशयाचे निवेदन आज रोजी देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -