fbpx

१० हजाराची गुंतवणूक करून मिळवा १६ लाख ; वाचा पोस्टाची खास योजना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । भारतीय पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी अनेक योजना आणत असते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुद्धा चांगला परतावा मिळतो. जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना हा एक चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना चांगली असते. यामध्ये कमी किंमतीत गुंतवणूक केल्यास मोठी कमाई होते. पोस्ट ऑफिसच्या अशा विविध योजनांपैकी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनाही एक उत्तम योजना आहे. कमी गुंतवणुकीत चांगला फायदा मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट अकाउंट ही एक सरकारी खात्रीशीर योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून तुम्ही फारच कमी पैशाने गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही महिन्याला १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. ही योजना 5 वर्षांसाठी असते.

दर तिमाहीत जमा झालेल्या पैशांवर चक्रवाढ पद्धतीनं व्याज जमा होते. पोस्ट खात्याच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या या योजनेवर ५.८ टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे.

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक १० वर्षांसाठी केली तर तुम्हाला म्यॅच्योरिटीवर १६,२६,४७६ लाख रुपये मिळतील.जर तुम्ही RDचा हप्ता वेळेत जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्ता लांबणीवर पडल्यास तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल.

तसेच जर तुम्ही सलग 4 हप्ते जमा केले नाहीत, तर तुमचे खाते बंद होईल. मात्र, खाते बंद झाल्यावर पुढील २ महिने ते पुन्हा अॅक्टिव्ह करता येऊ शकते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज