पाचोर्‍यात शिवसैनेतर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । विजय बाविस्कर।  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड (जि. रायगड) येथे ‘जनआशीर्वाद यात्रे’नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून राज्यातील सामाजिक सलोख्यालाच आव्हान दिले असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. यामुळे नारायण राणे यांच्यावर भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५ (२), १५३ ब(१)(क) खाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी पाचोरा शिवसेने तर्फे करण्यात अली.   

या फिर्यादीच्या खाली फिर्यादी म्हणून उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय शरद पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश भिमराव पाटील, जि.प. गट नेता मनोहर गिरधर पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद रमेश पाटील, भागवत पंडित पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, सुरेश गणसिंग पाटील, माधव धना पाटील, गजू पाटील, रमेश बाबुराव पाटील, पीपल्स बँक संचालक अविनाश कुडे, गणेश देशमुख, अरुण तांबे, प्रवीण ब्राह्मणे, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, कैलास पाटील, पदमसिंह पाटील, राजेश प्रजापत, तुषार जगताप, सचिन जगताप, जावेद शेख, शहर प्रमुख बंडू चौधरी, उपशहर प्रमुख अनिल सावंत, छोटू चौधरी, नगरसेवक दादा चौधरी तात्या चौधरी, घनश्याम महाजन, राजू चौधरी, मोतीलाल चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिक यांनी फिर्यादी म्हणून सही केली आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -