शिवसेनेतर्फे एरंडोल शहरात आंदोलन, घोषणाबाजी करून दिले निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ ।  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड (जि. रायगड) येथे ‘जनआशीर्वाद यात्रे’नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून राज्यातील सामाजिक सलोख्यालाच आव्हान दिले असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.  यामूळे एरंडोल शहरात दूपारी शिवसेनेतर्फे धरणगाव चौफुलीवर जोरदार आंदोलन, घोषणाबाजी केली. एरंडोल पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देत राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, जिल्हा आघाडी महिला प्रमुख महानंदा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, राजू जाधव, तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील,रवि चौधरी,रमेश महाजन,किशोर निबांळकर,राजु चौधरी,नाना महाजन,प्रसाद दंडवते,गोपाल महाजन,गजानन महाजन,प्रमोद महाजन,महेश महाजन,एकनाथ महाजन,नितीन महाजन,आरिफ मिस्त्री,शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -