मोरसिंग राठोड यांनी स्वखर्चाने बुजविले चाळीसगावातील खड्डे

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ ।  चाळीसगावातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे कच टाकून मोरसिंग राठोड आणि मित्र मंडळाच्या वतीने आज बुजविण्यात आले. चाळीसगावातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे,सामान्य जनतेला व माझ्या माता भगिनींना या खड्ड्यातून वाट काढतांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.मी केवळ सामाजिक बांधिलकी आणि मातृभूमीला देणं लागतोय या भावनेतून हे छोटेखानी सामाजिक कार्य हाती घेतलेले आहे..मला कुणाला दोष देण्यापेक्षा कार्य केलेलं आवडतं,बाकी दोष कुणाचा? सत्ताधाऱ्यांचा की विरोधकांचा? हे जनता ठरवेलच. असे मोरसिंग राठोड म्हणाले.
त्यामुळे खड्डे बुजविण्यात आल्याने चाळीसगावकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच चाळीसगावातील नागरिकांनी या कामाबद्दल मोरसिंग राठोड यांचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -