fbpx

दादा भारतीय बनावटीच्या राख्या आहेत का ?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१। चिन्मय जगताप। बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण रविवार २२ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गोलाणी मार्केट, फुले मार्केट संपूर्ण भागात राख्यांची दुकाने सजली आहे. तरुणी आणि महिला खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व महिला भारतीय बनावटीच्या राख्या विकत घेत आहेत. दुकानदारांना त्या विचारात आहेत कि दादा भारतीय बनावटीच्या राख्या आहेत का? भारतीयांमध्ये चीनविरुद्ध असलेला संताप यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली.

 

व्यापारी संभ्रमात
व्यापारी राजू माखिजा म्हणाले, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे, ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाऱ्यांनी बोलविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी आहे. सध्या २५ टक्केही व्यवसाय झाला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.

व्यवसाय बसला.
जळगाव शहरातून संपूर्ण जिल्ह्यात राखीची होलसेल विक्री होते. ठोक व्यवसाय एक महिन्यापूर्वीच सुरू होतो. पण यावर्षी कोरोनाचे संकट पाहता व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली नाही.ज्याचा फटका व्यवसायावर बसला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज