एरंडोल येथे १८ वर्षीय युवकाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१। बेडरूममधील हुकला दोरी बांधून गळफास घेत १८ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.१४ रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एरंडोल येथील वृंदावन नगरातील रहिवासी कमलेश पाटील (वय-१८) याने राहत्या घरातील बेडरूमधील छताला असलेल्या हुकला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.१४ रोजी सकाळी उघडकीस आली. कमलेश याला तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. कमलेश हा सेवानिवृत्त जवान विठ्ठल सखाराम पाटील यांच्या मुलगा असून तो धरणगाव येथे ११ वी सायन्सला शिक्षण घेत होता. याप्रकरणी नामदेव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज