fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

मामाच्या गावाला आलेल्या १८ वर्षीय तरूणीची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । मामाच्या गावाला आलेल्या १८ वर्षीय तरूणीने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी जळगाव तालुक्यातील रिधुर येथे उघडकीस आली. नंदीणी कडू तायडे (रा. १८ रा. अट्रावल ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाहीय. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील अट्रावल येथील नंदीणी ही काल बुधवारी सायंकाळी रिधूर येथे मामा मनोहर कोळी यांच्या घरी आली होती. रात्री जेवणानंतर सर्व जण झोपल्यानंतर छताला मध्यरात्री नंदीणी हिने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. मनोहर कोळी यांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास जाग आली असता, नंदीणी हिने गळफास घेतल्याचे दिसून आले. 

दरम्यान, नंदीणी हिने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे, पोलीस नाईक, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस पाटील प्रमोद पाटील यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज