जळगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । शहरातील वाघ नगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

वाघनगरात करण संजय शिंदे (वय-१८) हा आईवडील व भावासोबत वास्तव्याला आहे. करनचे वडील संजय आनंद शिंदे यांचे श्रीधर नगरात लॉन्ड्रीचे दुकान आहे. मंगळवार दि.१४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. करनने आत्महत्या केल्याचे बाजूच्या खोलीत झोपलेला लहान भाऊ नितीन याच्या लक्षात आले. त्याने लागलीच शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई शारदा, वडील संजय शिंदे, भाऊ नितीन असा परिवार आहे. प्राथमिक तपास स.फौ. सुरेश लोखंडे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -