निंभोरा येथून १८ वर्षीय तरुण बेपत्ता

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथील गीतेश विकास ढाके (वय-१८) हा तरुण दि.१५ रोजी बेपत्ता झाला असून हा तरुण आढळून आल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या पालकांकडून करण्यात आले आहे.

गीतेश विकास ढाके (रा.‌ निंभोरा, ता.रावेर) हा तरुण शुक्रवार दि.१५ रोजी सायंकाळी ५ वाजता मित्राकडे जाऊन येतो, असे त्याच्या वडिलांना सांगून निघाला होता. मात्र उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. याप्रकरणी निंभोरा पोलिसात हलविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या कुणाला दि.१५ रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर गीतेश कुठे दिसून आला असेल अथवा त्यानंतर कुठेही आढळून आला असेल तर तात्काळ ९४२१६४११८५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विकास ढाके यांच्याकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज