⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

पंढरपूरला जाताय? ‘या’ आहेत भुसावळहुन पंढरपूरकडे जाणाऱ्या गाड्या, जाणून घ्या तारीख-वेळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । आषाढी एकादशीसाठी पंढरपूरनगरी सज्ज झाली असून राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. हरिनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत आहेत. जर तुम्हीही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेने “पंढरपूर आषाढी एकादशी”निमित्त 76 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भुसावळमार्गे 18 गाड्या धावतील.

यात भुसावळ स्थानकावरून अनेक गाड्या धावतील. त्यामुळे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर या गाड्यांचा समावेश आहे.

या आहेत भुसावळहुन पंढरपूरकडे धावणाऱ्या गाड्या
भुसावळ-पंढरपूर विशेष (2 सेवा)
01159 विशेष गाडी 28.06.2023 रोजी भुसावळहून 13.30 वाजता सुटेल आणि दुसर्याू दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
01160 स्पेशल पंढरपूर येथून 29.06.2023 रोजी 22.30 वाजता सुटेल आणि दुसर्यार दिवशी 13.00 वाजता भुसावळला पोहोचेल.
थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा.
संरचना : 8 शयनयान, 6 जनरल सिटिंग, 9 जनरल सेकंड क्लाससह 1 लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन

खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता खामगावला पोहोचेल.
थांबे : जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 12 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01119 विशेष नवीन अमरावती येथून 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 14.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 19.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.40 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल.
थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित ,दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

नागपूर-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01207 स्पेशल नागपूरहून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01208 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 17.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी
संरचना : एक द्रुतीये वातानुकूलित , दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.

नागपूर-मिरज स्पेशल (4 सेवा)
गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01206 विशेष मिरज येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे.
संरचना : दोन तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.