fbpx

सिंधी कॉलनीत सट्टापेढीवर छापा, १८ जणांची धरपकड

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या सट्टापेढीवर शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी सट्टा घेणाऱ्या ३ जणांसह खेळणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रकाश तोलाराम कुकरेजा, सुरेश उर्फ डाबू मामा भाट, रोहित सुरेश भाट हे सट्टा घेताना मिळून आले. तसेच शांताराम पाटील, इम्रान खान, गजानन लकडे, निलेश लढ्ढा, विनोद सपकाळे, पंडित चव्हाण, कैलास बारेला, अशोक नेवे, पांडुरंग नाभणे, मुरलीधर चव्हाण, भिका गंडाळे, अशोक मकडीया, राजू पवार, बुधा झणके, अय्युब खाटीक हे सट्टा खेळताना मिळून आले. सर्व संशयितांकडून ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज