जळगाव मनपाची धडक कारवाई, नियम मोडणारे १७ दुकान सील

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांविरुद्ध शहर मनपाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दि.२६ आणि २७ रोज शहरातील तब्बल १७ दुकान सील करण्यात आले.

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

मनपाने मुल्ला आदम अली हसन अली, सोना महाजन ट्रेडर्स, रेणुकामाता इलेक्ट्रिकल्स, आदर्श हेअर आर्ट्स, रामा गिफ्ट नोव्हेलटी, संगीता लेडीज कॉर्नर, आशिष कलेक्शन, पवन मोबाईल, गोदडीवाला मोबाईल, सुपर मेन्स पार्लर, विजय मेन्स वेअर, गोपाल ट्रेडर्स, जगताप मेटल्स, रेडिमेड कपड्याचे गोडावून, मकरा केमिकल्स, मोईन लेहरी, इब्राहिम सन्स या दुकानांवर कारवाई करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज