केकसाठी आई घराबाहेर पडली अन् १५ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । थर्टी फर्स्टनिमित्त केक घेण्यासाठी आई बाहेर गेली असता घरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरात घडलीय. राधिका भागवत भोसले (वय – १५) असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, गेल्या तीन दिवसांपूर्वी राधिका ही आई व बहिणींसह जळगावातील इंद्रप्रस्थ नगरात भाड्याने घरात राहण्यासाठी आले होते. काल वर्षाचा अखेरचा दिवस होता. त्यानिमित्त आई बाहेर केक घ्यायला गेली होती. आई बाहेर गेल्याचे पाहून राधिकाने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. थोड्या वेळाने राधिकाची आई पंधरा ते वीस मिनिटांनी घरी आल्यावर मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. मुलीचा मृतदेह पाहून आईने जागीच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्थानकातील कर्मचारी करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -