१५ शेतकऱ्यांना २ व्यापाऱ्यांनी ३५ लाखात गंडविले, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । तालुक्यातील १५ केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून २ व्यापाऱ्यांनी केळीचा माल घेवून सुमारे ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्यासाठी ऍड. सेजल अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केले.

जळगावातील शेतकरी सुधीर चौधरी यांच्यासह १४ शेतकऱ्यांनी अशोक रघुनाथ पाटील (रा. निंभोरा, ता. रावेर) आणि महेंद्र सिताराम निकम (रा. जारगाव, ता. पाचोरा) या व्यापाऱ्यांना वेळोवेळी केळीचा माल दिला होता. वारंवार पैसे मागून देखील मिळत नसल्याने बुधवारी रामानंद नगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये सुधीर मधुकर चाैधरी (रा.पिलखेडा, ता. जळगाव), प्रमोद हरी पवार (रा.नंदगाव), योगराज नामदेव सपकाळे (रा. फुफनी), विजय रामकृष्ण सपकाळे (रा. फुफनी), रतिलाल माणिक पवार (रा. भोकर), रत्नाकर शिवलाल सोनवणे (रा. देवगाव), अनिल बाबुराव चौधरी (रा. पिलखेडा), मोहनचंद नारायण सोनवणे (रा. करंज), संजय रावण पाटील (रा. भोकर), मोहन एकनाथ सोनवणे (रा. फुफनी), शिवाजी पुरमल पाटील (रा. नंदगाव), मच्छिंद्र झावरू कोळी (रा. धानोरा), झेंडू महारू कोळी (रा. धार्डी), किशोर देवाजी सोनवणे (रा. गाढोदा), शिवदास भगवान चौधरी (रा. पिलखेडा) या १५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ३५ लाख २४ हजार ७२४ रूपयांची फसवणूक झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar