⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | शेळगाव बॅरेजसाठी १४० कोटी रुपयांची तरतूद ; आ.शिरीष चौधरींची माहिती

शेळगाव बॅरेजसाठी १४० कोटी रुपयांची तरतूद ; आ.शिरीष चौधरींची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तापी नदीवरील शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी राज्य सरकारने १४० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून माहिती देण्यात आली. शेळगाव बॅरेजसाठी निधी द्यावा. सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी आमदार चौधरींनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यास मंत्री पाटील यांनी प्रतिसाद देत प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणीमध्ये १४० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याचे कळवले आहे.

या निधीमुळे बॅरेजचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून बॅरेजमध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे आमदार कार्यालयाने कळवले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.