fbpx

प्रवाशांनो लक्ष द्या ! अल्प प्रतिसादामुळे ‘या’ १४ गाड्या रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । देशभरात कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता, नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत देखील लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे १४ अप व डाऊन मार्गातील रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यातील काही गाडी जून अखेर तर काही गाड्या २ जुलैपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी या रद्द केलेल्या गाड्यांची नोंद घेत प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

अशा आहेत रद्द केलेल्या गाड्या

mi advt

गाडी क्र. ०२१०९ मुंबई-मनमाड विशेष १ जुलैपर्यंत तर गाडी क्र. ०२११० मनमाड-मुंबई विशेष ३० जूनपर्यंत, गाडी क्र. ०११३१ दादर-साईनगर शिर्डी विशेष ३० जूनपर्यंत तर गाडी क्र. ०११३२ साईनगर शिर्डी-दादर विशेष १ जुलैपर्यंत रद्द, गाडी क्र. ०२११३ पुणे-नागपूर विशेष ३० जूनपर्यंत तर गाडी क्र. ०२११४ नागपूर-पुणे विशेष २९ जूनपर्यंत रद्द, गाडी क्र. ०२१८९ मुंबई-नागपूर विशेष १ जूलैपर्यंत. तर गाडी क्र. ०२१९० नागपूर-मुंबई विशेष ३० जूनपर्यंत रद्द, गाडी क्र. ०२१११ मुंबई-अमरावती विशेष १ जुलैपर्यंत तर गाडी क्र. ०२११२ अमरावती-मुंबई विशेष ३० जूनपर्यंत रद्द, गाडी क्र. ०२२७१ मुंबई-जालना विशेष ३० जूनपर्यंत आणि गाडी क्र. ०२२७१ जालना-मुंबई विशेष १ जुलैपर्यंत, गाडी क्र. ०२१४७ दादर-साईनगर शिर्डी विशेष २५ जूपपर्यंत तर गाडी क्र. ०२१४८ साईनगर शिर्डी-दादर विशेष २६ जूनपर्यंत, गाडी क्र. ०२०४१ पुणे-नागपूर विशेष २४ जूनपर्यंत तर गाडी क्र. ०२०४१ नागपूर-पुणे विशेष २५ जूनपर्यंत, गाडी क्र. ०२०३६ नागपूर-पुणे विशेष ३० जूनपर्यंत तर गाडी क्र. ०२०३५ पुणे-नागपूर विशेष १ जुलैपर्यंत, गाडी क्र. ०२११७ पुणे-अमरावती विशेष ३० जूनपर्यंत तर गाडी क्र. ०२११८ अमरावती-पुणे विशेष १ जुलैपर्यंत, गाडी क्र. ०२२२३ पुणे-अजनी विशेष २ जुलैपर्यंत. तर गाडी क्र. ०२२२४ अजनी-पुणे विशेष २९ जूनपर्यंत, गाडी क्र. ०२२३९ पुणे-अजनी विशेष २६ जूनपर्यंत तर गाडी क्र. ०२२४० अजनी-पुणे विशेष २७ जूनपर्यंत, गाडी क्र. ०१४०४ कोल्हापूर-नागपूर विशेष २८ जूनपर्यंत तर गाडी क्र. ०१४०३ नागपूर-कोल्हापूर विशेष २९ जूनपर्यंत, गाडी क्र. ०११३७ नागपूर-अहमदबाद विशेष ३० जूनपर्यंत तर गाडी क्र. ०११३८ अहमदाबाद-नागपुर विशेष ही गाडी १ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज