महापालिकेने ‘वॉटरग्रेस’ला दिलेली १३९ वाहने धावताय विना फिटनेस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेने वॉटरग्रेस या मक्तेदार कंपनीला दिलेल्या १४३ वाहनांपैकी १३९ वाहने विना फिटनेस धावत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वॉटरग्रेस कंपनीने या वाहनांचे फिटनेस करुन घ्यावे, याबाबत महापालिकेकडून वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र वॉटरग्रेस कंपनीकडून टोलवाटोलवी केली जात आहे.

महानगरपालिकेकडून जळगाव शहराच्या साफसफाईचा मक्ता वॉटरग्रेस या कंपनीला देण्यात आला आहे. साफसफाईच्या मक्त्यासाठी झालेल्या करारात नमुद केल्याप्रमाणे जळगाव महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीला १३० वाहने दिली असून १३ वाहने भाडेतत्वावर दिली आहेत. अशा एकूण १४३ वाहनांपैकी त्यापैकी १३९ वाहनांचे फिटनेस मार्च ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान संपुष्ठात आले आहे. त्यामुळे वॉटरग्रेस कंपनीने या वाहनांचे फिटनेस करणे आवश्यक होते. मात्र वॉटरग्रेस कंपनीकडून करारात फिटनेस करण्यासंदर्भांत उल्लेख नसल्याचे कारण पुढे करुन वाहनांचे फिटनेस करण्यास नकार दिला जात आहे.

पत्रव्यवहारानंतरही दुर्लक्ष
महापालिका प्रशासनाने करारनाम्यात वाहन दुरुस्ती व अनुषंगिक कामे मक्तेदाराने करावीत, असे स्पष्ट नमुद केले आहे. असे असतांनाही मक्तेदार कंपनी आपली जबाबदारी झटक आहे. मनपा प्रशासनाने मक्तेदाराला वाहनांचे फिटनेस करण्यासंदर्भांत वारंवार पत्र व्यवहार केला असून तीन वेळा स्मरण पत्र देखील दिले आहे. त्यानंतरही मक्तेदाराकडून वाहनांचे फिटनेस केले जात नसून उलट मक्तेदारांने ही जबाबदारी मनपावर ढकलली आहे.

काम बंदचा इशारा
महापालिकेने वॉटरग्रेस कंपनीच्या मक्तेदाराला तीन वेळा पत्र व्यवहार करून तीन वेळा स्मरण पत्र दिले आहे. तसेच सोमवारी मनपाच्या वाहन विभागाकडून मक्तेदाराला नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे मक्तेदाराने चक्क काम बंद करण्याचा इशारा महापालिकेला दिला आहे. ‘वाहन फिटनेस संदर्भांत वारंवार पत्र व्यवहार केल्यास शहरातील साफसफाईचे काम बंद करण्यात येईल’ असे मक्तेदाराने मनपाला पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -